मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाला गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडची साथ
मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाला गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडची साथ
पुणे – मलेरिया निर्मूलन आणि डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडकडून धोरणात्मक तांत्रिक सहाय्य मिळणार आहे. मलेरिया निर्मूलन आणि डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी उदयोन्मुख बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड, सेंटर फॉर हेल्थ रिसर्च अँड इनोव्हेशन आणि फॅमिली हेल्थ इंडियाने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाशी तांत्रिक सहकार्य करार केला आहे.
यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य सेवा, यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अहोना घोष, महाव्यवस्थापक, सस्टेनेबिलिटी गुड अँड ग्रीन, जीसीपीएल), डॉ. सपकाळ, प्रादेशिक संचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण, डॉ. जगताप, राज्य कीटकशास्त्रज्ञ, डॉ. सचिन गुप्ते, संचालक, पाथ, डॉ. राउत्रे, संचालक, पाथ, डॉ. अमरेश कुमार, डॉ. बिस्वाल, तांत्रिक सल्लागार, पाथ, डॉ. बित्रा जॉर्ज, संचालक, फॅमिली हेल्थ इंडिया, सोम कुमार शर्मा, सहयोगी संचालक, फॅमिली हेल्थ इंडिया उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुंबई येथील डॉ. संजीव कुमार जाधव, उप संचालक, डॉ. संजय जठार सहाय्यक संचालक व सर्व परिमंडळाचे हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक तसेच सर्व जिल्हा हिवताप अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते
मलेरिया आणि इतर डास जनित आजार महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्याच्या समस्या आहेत. या सहकार्य कराराअंतर्गत गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे-पालघर या आदिवासी आणि मोठे वन क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून, मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीवर नियंत्रण ठेवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तीन राज्यस्तरीय तज्ज्ञ आणि जिल्हास्तरीय २४ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
#HealthDept #Maharashtra #Maleria #Dengue #Chikangunya