पहिल्या टप्यात 50 कोटींची तरतुद, प्रकल्प सर्वेक्षणास 21 लाख रुपये मंजूर, सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

पहिल्या टप्यात 50 कोटींची तरतुद, प्रकल्प सर्वेक्षणास 21 लाख रुपये मंजूर,सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चोंडी येथील राष्ट्रीय स्मारक  विकास आराखडा अंतर्गत मंजुरी

सिना नदीवर होणार 2 बुडीत बंधारे, 150 कोटी खर्च अपेक्षित !

मुंबई , दिनांक 16 :- विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चोंडी येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने चोंडीच्या सिना नदीवर 2 बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी 150 कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात 50 कोटींची तरतूद करण्यात आली असून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सरकारने 21 लाख रूपये मंजुर केले आहेत. या बंधाऱ्यांमुळे सिंचन, पाणीपुरवठा, नदीपात्राचे सौंदर्यवर्धन आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चोंडी (ता. जामखेड) येथे 6 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या श्री क्षेत्र चोंडी बृहत विकास आराखड्याससरकारने मंजुरी दिली होती.  या आराखड्यासाठी 681 कोटी 32 लाख रूपये खर्चाच्या मान्यता देत शासन निर्णय जारी करण्यात आला होता.

त्यानंतर पावसाळी अधिवेशनात चोंडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी सरकारने 360 कोटींचा निधी मंजुर केला होता आता चोंडी येथील सिना नदीवर 2 बुडीत बांधण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी यासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करत प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणासाठी रु. 21.13 लाख खर्च मंजूर करण्यात आला आहे, हे काम महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. या कामामुळे नदीपात्राचे सौंदर्यवर्धन होणार आहे. तसेच नदीत पाणीसाठा वाढून परिसराला दीर्घकालीन सिंचन व पाणीपुरवठ्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

श्री क्षेत्र चौंडी बृहद विकास आराखड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचे सुशोभीकरण, नदीत भव्य पुतळा, चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने व खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ, चौंडी परिसरातील ऐतिहासिक, पौराणिक स्मृतीस्थळांचे जतन, पायाभूत सुविधा उभारणी, सिना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण, तसेच दोन बुडीत बंधारे बांधणीचा समावेश आहे.

विकास आराखड्याचा निधी तपशील :-

1) चौंडी येथील स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन रु. ६८१ कोटी ३२ लाख

2) चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे रु. ३६० कोटी

3) सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे रु. १५० कोटी (पहिला टप्पा तरतुद ५० कोटी)

एकूण मंजुर निधीरु. १०९१ कोटी ३२ लाख (आज अखेर) + मिळणारा वाढीव निधी १०० कोटी त्यानुसार एकुण निधी होणार ११९१ कोटी ३२ लाख रूपये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button