लोककल्याणकारी योजनांमुळे सर्वसमावेशक विकासाला गती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोककल्याणकारी योजनांमुळे सर्वसमावेशक विकासाला गती– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·       881 कोटी रू. निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

·       यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडणार

·       शासन आपल्या दारी’ उपक्रमात 50 हजार नागरिकांची उपस्थिती

·       जिल्ह्यात 16 लाख नागरिकांना 601 कोटी रू.  निधीतून लाभांचे वितरण

            यवतमाळ, दि. 30 ऑक्टोबर, 2023: मागील वर्षभरात राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजना व निर्णयांमुळे युवकज्येष्ठ नागरिकमहिलावंचितदिव्यांग आदी सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी केले.

            यवतमाळ जवळच्या किन्ही गावाजवळ शासन आपल्या दारी’ अभियानात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. जिल्ह्यात 881 कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.  मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोडखासदार भावना गवळीआमदार भरत गोगावलेप्रा. डॉ. अशोक उईकेकिरण सरनाईकइंद्रनील नाईकडॉ.संदीप धुर्वेसंजीव रेड्डी बोदकुरवार,  प्र. विभागीय आयुक्त संजय पवारविशेष पोलीस  महानिरीक्षक जयंत नाईकनवरेजिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियामुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोषपोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीऔद्योगिक विकासाच्या दृष्टीने यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईनागपूर या महानगरांशी वेगवान संपर्क होऊन दळण-वळणव्यापार व रोजगार वाढेल. यवतमाळ जिल्ह्यात व्हितारा कंपनीसह नामांकित उद्योग सुमारे 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. आदिवासी समाजबांधवांची संस्कृती व गौरवशाली इतिहासाच्या जोपासण्यासाठी बिरसा मुंडा वस्तुसंग्रहालय उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची पदे लवकरच भरण्यात येतील. ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येईल. वन्यप्राण्यांपासून शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी 21 हजार शेतक-यांना सौर झटका’ यंत्रांचे वितरण करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

            शेतकरी बांधवांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे. शेतीसाठी आपत्तीकाळातील नुकसानभरपाईचे प्रमाण दुपटीवर नेले आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. सिंचनासाठी गेल्या दोन वर्षांत 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या किसान सन्मान योजनेत राज्य शासनाने प्रतिव्यक्ती 6 हजार रुपयांची भर घालून अंमलबजावणीला गती दिली आहे. नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत देय उपचार निधी दीड लाखांहून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

            जिल्ह्यात अभियान कालावधीत 16 लाख नागरिकांना 601 कोटी रुपयांच्या निधीतून विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी  जिल्ह्यात 75 ‘मॉडेल स्कूलसुरू करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            ते पुढे म्हणाले कीराज्य शासनाने महिलांसाठी एसटी प्रवास सवलतमुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी लेक लाडकी ब्रॅण्डिग’ योजनामहिला बचतगटांचे खेळते भांडवल दुप्पट करणेतसेच गटांकडून उत्पादित वस्तूंचे ब्रॅडिंग व विपणनाचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असूनकायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देऊअशीही ग्वाही त्यांनी दिली.

            पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले कीराज्य शासन शेतकरी बांधवमहिला व वंचितांसाठी विविध योजना राबवित असूनमोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. सिंचनाच्या दृष्टीने महत्वाची असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना मदत मिळाली आहे.  खासदार श्रीमती गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांच्या 25 लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी सौर झटका यंत्राच्या प्रात्यक्षिकाचे अवलोकन केले. त्यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना  विविध कृषी अवजारेतसेच ट्रॅक्टरच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.

            जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी प्रास्ताविक केले. मंगला माळवे व अमिन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आभार मानले. कार्यक्रमात सुमारे 50 हजार नागरिक उपस्थित होते. 

Related Articles

Back to top button