नवे संकेतस्थळ सांस्कृतिक कार्य विभागाला लोकाभिमुख करणारे ठरेल – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई :राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संकेतस्थळ विभागाच्या कार्यप्रणालीला लोकाभिमुख करणारे ठरेल. सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सर्वांसाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरणारे असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मंत्रालयात मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्य विभागाच्या https://cultural.maharashtra.
या नव्याने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर विभागातील विविध कार्यासने, क्षेत्रीय कार्यालये, महामंडळे आदींची माहिती देण्यात आली आहे. यावेळी अधिनस्त कार्यालये असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पुराभिलेख संचालनालय, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, दर्शनिका विभाग, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य हिंदी-सिंधी- गुजराती साहित्य अकादमी, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव आणि कोल्हापूर चित्रनगरी यांची माहितीही देण्यात आली आहे.
याशिवाय, विभागांची एकत्रित माहिती. विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती, विविध कार्यक्रमांची छायाचित्रे आणि व्हिडिओच्या समावेशाने हे संकेतस्थळ वापरकर्त्यांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सांस्कृतिक विभागाच्या विविध योजना, पुरस्कार, स्पर्धा व शिबिरे, महोत्सव, प्रशिक्षण कार्यक्रम आदींची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.