लबाड लांडगं ढोंग करतंय; प्रशासन, नगरपालिका सोंग करतंय

बीड शहर कचरा आणि घाणीच साम्राज्य आहे. शहरात घाण आहे का घाणीत शहर हेच कळेनासे झाले. नगरपालिकेच्या नावाने कितीही ओरडले तरीही काहीच फरक पडत नाहीये. वाटते की नगरपालिका आता बहिरी आणि झोपलेली आहे. बीड शहर स्वच्छ करण्याचे काम आता जनतेवर आलेली आहे. जनतेने वेळीच जागे होऊन हे शहर स्वच्छ करण्याचे काम केले पाहिजे.
आता वेळ आली आहे. नगरपालिका झोपली कि काय? का झोपायचे नाटक करते हेच कळतं नाही. बीड शहरात घाणी मुळे एखादा रोग लागून माणसाला मारण्याचे काम हि नगरपालिका करते.माणसे मेल्यावरच या नगरपालिकेला
आणि प्रशासनाला हायसे वाटेल कि काय अशीच परस्थिती उद्भवली आहे.सध्यातर काय नगरसेवक हि नाही, नगराध्यक्ष नाही सगळीकडे वा हि वा आणि प्रशासनाला तर इकडे लक्ष द्याचेच नाही. प्रशासन तर काय अन नगरपालिका काय झोपायचं सोंग घेऊन आहे.प्रशासन एवढे थंड का हेच कळतं नाही.
प्रशासनाला फक्त गाडगेबाबा जयंती आल्यावर आणि शहरात एखादी मोठी हस्ती आल्यावर च स्वच्छता करायची माहितीये. गाडगेबाबा जयंती आल्यावर त्यांचे भाषण करायचे आणि फोटोला मोठं मोठे हार घालून पेपरला फोटो द्याचे माहिती आहे. फोटो तर इतके असतील की प्रत्यक्षात आता गाडगेबाबा प्रगट होणार आहेत असे वाटते. गाडगेबाबा फक्त बोलत न्हवते हातात खराटा घेऊन प्रत्यक्षात स्वच्छता करत असत. आपली मात्र फक्त बोलाची कढी अन बोलाचाच भात अशी अवस्था झाली आहे.आपली खराठा हातात घेण्याचीच तयारी नाही. गाडगेबाबा च्या फोटोतला खराटा पाहायचा अन मेल्यागत शांत राहायचं. या घाणी मुळे किती तरी लहान मुले, वयस्कर माणसे यांना रोगाची लागण होऊन गंभीर आजार होऊ शकतात. मुददाड मनाच्या या प्रशासनाला त्यांच्या घरातील माणसे मेल्या शिवाय झोपेतून जाग येणार नाही.बीड शहरातील जागोजागी कचरा आणि घाणीच साम्राज्य आहे. शहरात घाण आहे का घाणीत शहर हेच कळेनासे झाले. नगरपालिकेच्या नावाने कितीही ओरडले तरीही काहीच फरक पडत नाहीये. वाटते की नगरपालिका आता बहिरी आणि झोपलेली आहे. बीड शहर स्वच्छ करण्याचे काम आता जनतेवर आलेली आहे. जनतेने वेळीच जागे होऊन हे शहर स्वच्छ करण्याचे काम केले पाहिजे.
आता वेळ आली आह.
म्हणूनच म्हणते आता जनतेने ठरवले पाहिजे की आपल्या कॉलनीत कचरा सफाई करून आपल्या कॉलनीत आपणच एक कचरा कुंडी ठेऊयात.
नेहमीच प्रशासनाला नावे ठेऊन नाही जमणार आणि नावे ठेऊन पण प्रशासनाला काही फरक पडत नाही. त्या मुळे आपली कॉलनीत, गल्ली स्वच्छ ठेवण्याचे काम करूयात.
आपण जनता हि देरे हरी बाजावरी अशी अवस्था आहे आपली. चला उठा, जागे व्हा आणि एकत्रित पणे येऊन गाडगेबाबा ची शिकवण आठवू.
चला तर मग….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button