भिवंडी निजामपूर मनपातील प्रभारी सहायक आयुक्तांच्या विभागीय चौकशीचा अहवाल १५ दिवसांत मागविणार-मंत्री उदय सामंत
भिवंडी निजामपूर मनपातील प्रभारी सहायक आयुक्तांच्या विभागीय चौकशीचा अहवाल १५ दिवसांत मागविणार– मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. 15 : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील प्रभारी सहायक आयुक्तांची विभागीय चौकशी सुरू असून त्याचा अहवाल १५ दिवसांच्या आत मागविण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य नीलेश लंके यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, सोमनाथ सोष्टे यांना प्रभारी सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती क्र.५ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला असताना नाले व गटार सफाई करण्याकरिता मजुरांचे वेतन देण्याकरिता त्यांनी घेतलेल्या अग्रिमाचा ताळमेळ सादर केलेला नाही. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास महानगरपालिकेमार्फत दिलेल्या नोटिसीचा खुलासा प्राप्त न झाल्यामुळे त्यांच्या मासिक वेतनातून दरमहा रक्कम कपात करण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशास अनुसरून कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य रईस शेख, प्रशांत बंब, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले.