आमदार निकोले यांचे नागपूर विधानभवनात पालघर जिल्ह्यातील प्रश्नांवर जोरदार आंदोलन


नागपूर / डहाणू. (प्रतिनिधी) १२/१२/२०२३- हिवाळी अधिवेशना निमित्ताने एकच जिद्द – वाढवण बंदर रद्द, वरकस, देवस्थान, गायरान जमीन कासणाऱ्यांच्या नावे करा, पेसा भरती त्वरित झालीच पाहिजे, असे फलक झळकावत जोरदार घोषणा देऊन भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी नागपूर येथे पालघर जिल्ह्यातील गंभीर प्रश्नांवर आंदोलन केले आहे.
यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, आज मी जो हा बॅनर घेतला आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर्ती यांच्या मध्ये माझी प्रथम मागणी आहे की, वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे जे पालघर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेले आहे. आठवड्याभरा पूर्वी एक बैठक झाली त्या बैठकी मध्ये आम्हाला प्रेझेंटेशन दाखवण्यात आले आणि त्याच मध्ये या वाढवण बंदर मुळे पालघर जिल्ह्यातील रहिवाश्यांना आणि मच्छीमारांना किती फायदा आहे हे दाखविण्यात आले. परंतु, त्यांच्यापासून किती नुकसान आहे आम्हाला अजिबात सांगण्यात आले नाही. आणि खरे म्हणजे पालघर जिल्ह्यामधील जो माझा मतदार संघ आहे डहाणू ! डहाणू येथील वाढवण जे गाव आहे इथे हा बंदर होणार आहे. आणि या समुद्र किनाऱ्या संपूर्णतः जो मच्छिमार आहे हा उध्वस्त होणार आहे. मुंबई पासून ते झाई पर्यंतचा मच्छीमार आहे तो या बेल्ट मध्ये मच्छीमारी करत असतो आणि आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असतो. त्याचप्रमाणे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. ग्रामीण भागातला राहणारा जो आदिवासी बांधव आहे हा मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये खलाशी म्हणून रोजगाराच्या माध्यमातून तो जात असतो. आणि या भागातील मच्छिमार उध्वस्त झाला ? तर यांच्या मध्ये दोन लोकांचे रोजगार हे हातातून निघून जातील. एक तर मच्छिमारांचा जो रोजगार आहे तो निघून जाईल. आणि ग्रामीण भागामध्ये समुद्र किनाऱ्यापासून 50 कि. मी. राहणार जो आदिवासी बांधव आहे. हा जो बोटी मध्ये खलाशी म्हणून कामाला जातो. याचा सुद्धा रोजगार उध्वस्त होणार आहे. त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये संपूर्णतः राहणारा शेतकरी आहे. हा शेतकरी अल्पभूधारक आहे. ज्याकडे 2 एकर, 3 एकर जागा आहे. अश्याप्रकारचा जो शेतकरी हा सुद्धा संपूर्णतः उध्वस्त होणार आहे. मुख्यतः या भागामध्ये खाजन भाग मोठ्याप्रमाणामध्ये आहे. छोटी मच्छी चे प्रजनन होतं ते याच भागात होते. आणि भागात मध्ये जर मातीचा भराव केला तर संपूर्णतः खाजन नष्ट होणार आहे. आमच्या माहिती प्रमाणे समुद्र किनाऱ्या पासून 05 कि.मी. वर 5000 एकर वर जागा हा भराव करणार आहे आणि त्याच्यामुळे संपूर्णतः समुद्र किनाऱ्यावर राहणारा जो मच्छीमार आणि इतर समाज जो आहे हा उध्वस्त होणार आहे. काही वर्षांपासून ह्या भागामध्ये पाण्याची पातळी आहे ही डहाणू शहराच्या काही गावांमध्ये समुद्राचे पाणी घुसलेले आहे.
त्याचप्रमाणे समुद्र किनाऱ्यापासून 7 ते 8 कि.मी. वर जे गाव आहे यांच्या मध्ये जे पिण्याचे पाणी आहे विहिरींना खारट पाण्याची पातळी ही वाढलेली आहे. आणि जर हे वाढवण बंदर झाले तर संपूर्णतः पिण्याच्या पाण्याचे नुकसान होणार आहे. शेतीचे नुकसान होणार आहे. आम्हाला फायदे दाखवले जाणार परंतु, डहाणू येथे मोठ थर्मल पॉवर आहे आज जे अदानी कंपनी कडून चालवले जात ज्यापासून खूप मोठे नुकसान आहे. त्याच्यापासून उडणारी जी राख आहे ही तिथल्या आजूबाजूच्या चिक्कू बागायतदार आहे चिक्कू वर परिणाम झाला आहे. शेती वर परिणाम झाला आहे. त्यामुळे या वाढवण बंदरा पासून या भागात खूप मोठे नुकसान होणार आहे आणि गेल्या काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणावर इथला हा रहिवाशी रस्तावर उतरत आहे आणि मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करत आहे आणि विरोध करत आहे तरी सुद्धा सरकार या आंदोलनाला आणि या शेतकऱ्यांच्या आणि मच्छीमारांच्या विरोधाला न जुमानता हे वाढवण बंदर रेटण्याचा पुढे प्रयत्न करत आहे तरी सुद्धा आज या भागा मध्ये संपूर्ण शेतकरी नाराज झालेला आहे. कोणत्याही परिस्थितीत मध्ये हे वाढवण बंदर होऊ देणार नाही अशाप्रकारे पालघर जिल्ह्यातील मध्ये शेतकऱ्यांची आणि तिथल्या लोक प्रतिनिधींची आणि इतर ज्या संघटना आहे संघटनांची भूमिका आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले म्हणाले.
***