कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई दि. 5/11/2023 : कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या समस्याबाबत बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, रघुनाथ दादा पाटील, इंद्रीस नायकवाडी यांच्यासह विविध कुक्कुटपालन सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शितलकुमार मुकणे, सहनिंबधक शहाजी पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सहकार विकास निगम मार्फत कुक्कुट पालन सहकारी संस्थांना दिलेल्या थकीत कर्ज फेडीबाबत सहकारी संस्थांकडून आलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल. तसेच या बाबतीत वित्त विभागाची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. असे ही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.