राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३ अर्ज भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३ अर्ज भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

            मुंबई, दि.३ : भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३’ साठी ऑनलाइन अर्जाची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.

            हे पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक, संस्था आणि विद्यापीठ यांना दिले जातात. मेजर ध्यानचंद खेलरत्न (MDKR) पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार (RKPP) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक पुरस्कारांच्या सूचना मंत्रालयाच्या www.yas.nic.in संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. या सर्व पुरस्कारांसाठी या सूचनांचे पालन करुन पुरस्कारासाठी पात्र खेळाडू / प्रशिक्षक / संस्था / विद्यापीठांनी दि.१० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत.

            ऑनलाइन अर्ज dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरताना कोणत्याही अडचणी आल्यास, अर्जदार क्रीडा विभागाशी sportsawards-moyas@gov.in या संकेतस्थळावर किंवा क्र. ०११-२३३८७४३२ या दूरध्वनीवर दि.१७ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संपर्क साधता येईल. तसेच, ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सहकार्य आवश्यक असल्यास दि.१० नोव्हेंबर,२०२३ पर्यंत सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या कालावधीत टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800-202-5155 आणि 1800-258-5155 उपलब्ध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button