राजे बख्त बुलंद शाह यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरणासाठी आराखडा तयार करावा -मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. 16 : नागपूर सुधार प्रन्यास मार्फत नागपूर शहराचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या समाधीस्थळाचे जतन आणि परिसराचे नूतनीकरण संदर्भात प्राधिकरणाच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती, मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य डॉ. देवराव होळी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या परिसराचा आराखडा प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे. यासंदर्भात राजे बख्त बुलंद शाह यांच्या सन्मानार्थ राजघाट परिसराचे सौंदर्यीकरण, सांस्कृतिक समाज भवन उभारणी करण्याबाबत अधिक माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.