बाल रुग्णांना अचूक रक्त पुरवठा करण्यासाठी आणि रक्ताचा डिस्ककार्ड रोखण्यासाठी आवश्यक मशिन सर्व रक्त केंद्रात उपलब्ध होणार
बाल रुग्णांना अचूक रक्त पुरवठा करण्यासाठी आणि रक्ताचा डिस्ककार्ड रोखण्यासाठी आवश्यक मशिन सर्व रक्त केंद्रात उपलब्ध होणार
– प्रा. डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री
नागपूर, दि. १३ डिसेंबर – बाल रुग्णांना अॅलिकॉट बॅगव्दारे रक्त पुरवठा करण्यासाठी आणि रक्ताचा डिस्ककार्ड रोखण्यासाठी आवश्यक स्टर्लिंग कनेक्टिंग डिवाइस ही मशीन राज्यातील सर्व रक्त केंद्रात येत्या एक महिन्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तर देताना सांगितली.
सद्यस्थितीत राज्यातील बहुतांश रक्त केंद्रामध्ये आणि रक्त पेढ्यांमध्ये बाल रुग्णांसाठी रक्त संक्रमण आवश्यक असल्यास त्या रुग्णास संपूर्ण रक्तपिशवी ( ३५० मि.ली.) रक्त संक्रमणासाठी देण्यात येते. या संपूर्ण रक्तपिशवीमधून बालरोगतज्ञ गरजेनुसार व बालकाच्या वजनाप्रमाणे आवश्यक प्रमाणात (मि.ली मध्ये) रक्त संक्रमण करतात व उर्वरीत रक्त डिसकार्ड करण्यात येते. एखाद्या बालकास १०० मि.ली. रक्ताची आवश्यकता असल्यास, सदर बालकास संपूर्ण रक्तपिशवीतून १०० मि.ली. रक्त पुरवठा करण्यात येतो व उर्वरीत २५० मि.ली. रक्त डिसकार्ड करण्यात येते.
त्यानंतर त्या बालकास रक्ताची गरज भासल्यास, पुन्हा दुसरी ३५० मि.ली. ची संपूर्ण रक्तपिशवी वापरून त्याच संक्रमणासाठी देण्यात येते व त्यामधून १०० मि.ली. रक्त वापरून उर्वरीत रक्त डिसकार्ड करण्यात येते. त्यामुळे ज्या रक्त केंद्रामध्ये स्टर्लिंग कनेक्टिंग डिवाइस ही मशीन उपलब्ध नाही अशा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त डिस्कार्ड होते.
तथापी, काही रक्तकेंद्रामध्ये ही मशिन उपलब्ध असल्यामुळे या मशीन वापरात आणून बालरुग्णासाठी आवश्यक प्रमाणात हे रक्त संपूर्ण रक्तपिशवी (३५० मि.ली.) मधून काढून गरजेनुसार ५० मिली. मि.ली., १५० मि.ली. अशा रक्तपिशवीमध्ये विभागून (अॅलिकॉट) देण्यात येते व त्या १०० रक्तपिशवीतील उर्वरीत रक्ताचा रुग्णासाठी पुनःश्च वापर करण्यात येतो. रुग्णास पुनःश्च रक्ताची आवश्यकता असल्यास पूर्वीच्या त्याच मूळ रक्तपिशवीमधून पुनःश्च आवश्यकतेनुसार रक्त पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे रक्ताचे डिसकार्डचे प्रमाण कमी करणे शक्य होते.
सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त ३१ रक्तकेंद्रांपैकी केवळ ८ रक्तकेंद्रांमध्ये तसेच वैद्यकिय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १४ रक्तकेंद्रांपैकी केवळ ३ ठिकाणी या मशीनची सुविधा उपलब्ध आहे. यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रा डॉ सावंत यांनी राज्यातील सर्व रक्त केंद्रांमध्ये ही मशीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती दिली
#ChildHealth #WinterAssembly #HiwaliAdhiveshan #HealthDept #Tanajisawant @Tanajisawant