कामगार कल्याणच्या बालनाट्य स्पर्धेत “जा रे जा, सारे जा ” ! सर्वप्रथम


कामगार कल्याणच्या बालनाट्य स्पर्धेत जा रे जा, सारे जा ! सर्वप्रथम
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत विविध आस्थामानांमध्ये काम करणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांकरिता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम कार्यक्रम व योजना राबविल्या असून संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार व त्यांचे कुटुंबीय सातत्याने त्याचा लाभ घेत आहेत. कामगारांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांपैकी बालनाट्य महोत्सवाला अनन्य साधारण महत्व दिले जाते. बालकलाकारांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन मुलांना अभिनय समृद्ध करण्याचा उद्देश साध्य केला जातो. याकरिता दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील १९ गट कार्यालयांच्या स्तरावर बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते.
ठाणे गटांतर्गत येणाऱ्या केंद्रांचा बालनाट्य महोत्सव नुकताच कामगार कल्याण भवन, विक्रोळी येथे संपन्न झाला. या बालनाट्य महोत्सवात वागळे इस्टेट, ठाणे येथील कामगार कल्याण केंद्राच्या *जा रे जा सारे जा या* बालनाट्याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली तर उल्हासनगर केंद्राच्या *बहरला मधुबास नवा* द्वितीय क्रमांकाचे, वर्तक नगर केंद्राच्या *येरे येरे पावसा* तृतीय क्रमांकाचे, विक्रोळी केंद्राच्या *उत्सव* उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचे व टिळक नगर केंद्राच्या *डीट्टो डीट्टो* या बालनाट्याने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आर्च फार्म लॅब लिमिटेड, डोंबिवलीचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय कोकणे , प्रमुख पाहुणे म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका का.अ.प (शहर) विभागाचे तांत्रिक समयलेखक विनोद साडविलकर हे उपस्थित होते. ठाणे विभागाचे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त *नितीन पाटील* यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी सर्व बाल कलाकारांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. एकूण १० बालनाट्य संघांनी सहभाग घेतलेल्या स्पर्धेचे परीक्षण *अभिजीत जाधव, विजय गोरेगावकर व रेश्मा पवार* यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : अभिनय मुले -प्रथम क्रमांक रुद्र डांगे वर्तक नगर केंद्र, द्वितीय क्रमांक साईराज सांगळे टिळक नगर केंद्र, तृतीय क्रमांक नैतिक भोसले वागळे इस्टेट केंद्र, अभिनय मुली -प्रथम क्रमांक अहिल्या मोरे उल्हासनगर केंद्र, द्वितीय क्रमांक प्रणती थोरात वर्तक नगर केंद्र, तृतीय क्रमांक पर्णिका गडकरी वागळे इस्टेट केंद्र, दिग्दर्शन -प्रथम क्रमांक करिष्मा वाघ वागळे इस्टेट केंद्र, द्वितीय क्रमांक चेतन पवार उल्हासनगर केंद्र, तृतीय क्रमांक अरविंद सरफरे वर्तक नगर केंद्र. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार केंद्र संचालक संजय गुरव यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ठाणे गटातील सर्व महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.