त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त महाआरती व दिपोत्सव, आमदार रविंद्र वायकर यांची संकल्पना
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र
त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलावावर रविवारी महाआरती व दिपोत्सव
– शिवसेना नेते व आमदार रविंद्र वायकर यांची संकल्पना
– तलावात दिव्यांची आरास करण्यात येणार
– महाआरतीवेळी ढोल, ताशा, झांज, मृदुंगाचा गजर
– आरती ओवळण्यासाठी महाराष्ट्राच्या पारंपारीक वेषात ३० ते ३५ जण सहभागी
– जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव आदी विभागातील रहिवाशीही होणार सहभागी
मुंबई : 24/11/2023 : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील मिनी चौपाटी अशी ओळख असलेल्या लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त दिपोत्सव व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून या महाआरतीचे रविवार २६ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीला जोगेश्वरी, गोरेगाव व अंधेरी येथील रहिवाशी उपस्थित राहणार आहेत.
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व) येथे हा शामनगर तलाव आहे. या तलावात गेली अनेक वर्ष मोठ्या भक्तीभावनेने गणेश व देवी भक्त मुर्तींंचे विसर्जन करीत आहेत. या तलावावर विविध जाती धर्मांच्या जनतेचे अनेक धार्मिक कार्यक्रम या तलावावर श्रद्धेने करण्यात येतात. त्यामुळे लोकमान्य टिळ गणेश विसर्जन तलाव हा विविध जाती धर्माच्या जनतेचे श्रद्धास्थान बनले आहे. या तलावाला आमदार वायकर यांन आकर्षक असे रुप दिल्याने हा तलाव जोगेश्वरी बरोबरच आसपासच्या विभागातील रहिवाशांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मुंबईकरांबरोबरच पर्यटकांचेही हा तलाव आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
जनतेच्या मनातील श्रद्धास्थान असलेल्या या तलावावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी 7 वाजता दिपोत्सव व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. आरती ओवळण्यासाठी पारंपारीक वेषात ३० ते ३५ जण सहभागी होणार आहे. आरतीच्यावेळी ढोल, ताशा, झांज, मृदुंगाचा गजर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तलावातील पाण्यामध्ये व सभोवताली दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. गंगा नदीच्या तिरावर करण्यात येणार्या महाआरतीच्या धर्तीवर लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव येेथे महाआरती करण्यात येणार असल्याने हजारो भक्त यात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.