मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना १४९ ची नोटीस


मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना १४९ ची नोटीस
जरांगे पाटील यांचे जिवीताची जबाबदारी सरकारची
मुंबई :31/10/2023 : मराठा आरक्षण सरकारने द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण चालू केले होते. सरकारने यात हस्तक्षेप केला. मनोज जरांगे पाटील यांचे कडे सरकारने ३० दिवसांचा मुदत कालावधी मागीतला ३० दिवसात आम्ही आरक्षंण देतो तुम्ही उपोषण सोडा.. उपोषण सोडायला दस्तूर खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरवाली सराटी येथे गेले होते.
सरकारने मागितली ३० दिवसाची मुदत मनोज जरांगे पाटील यांनी दिली ४० दिवसाची मुदत पण या ४० दिवसात सरकार मराठा आरक्षण देऊ शकले नाही. म्हंणुन मनोज जरांगे पाटील पुन्हा एखदा आमरण उपोषणाला बसले आहेत यातुन जर मनोज जरांगे पाटील यांचे जिवीताला काही अपाय झाला तर त्याची संपुर्ण जबाबदारी सरकारची राहील. सरकारच्या फसव्या आश्वासनाने आधीच मराठा समाज प्रक्षुब्द झालेला आहे जर जरांगे पाटील यांचे जिविताला काही अपाय झाला तर त्याची तिव्र प्रतिक्रिया संपुर्ण महाराष्ट्रात उमटेल… वात पेटली आहे धमाक कधीही होऊ शकतो ? तेव्हा सरकारने कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण तात्काळ जाहीर करावे.आपला नम्र, सुभाष तळेकर