PAP घोटाळ्यात “पवार परिवार” सामील – डॉ. किरीट सोमैया


PAP घोटाळ्यात “पवार परिवार” सामील – डॉ. किरीट सोमैया
मुंबई महापालिका ठाकरे सरकारचा रुपये 20 कोटींच्या PAP घोटाळ्यात आता श्री. शरद पवार – पवार परिवाराचे नावही पुढे आले आहे. भांडूप येथील 1903 सदनिकेचा कॉन्ट्रॅक्ट चोरडीया बिल्डरचा पुणे येथील न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. ला देण्यात आला. न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने यासाठी श्री. शरद पवारांचे बंधू श्री. प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनी सोबत केला आहे. हि जागा श्री. प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीची आहे. त्याच्या सोबत या सदनिका बांधण्यासाठीचे डेव्हलपमेंट राईट, करार चोरडिया समूहाच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने केले आहे.
1903 सदनिका महापालिका बाजारभावाने रु. 58 लाखात एक सदनिका प्रमाणे घेणार आहे. ही सदनिका बांधण्यासाठीजमीन व बांधकामाचा खर्च म्हणून 15 ते17 लाख खर्च होणार आहे. म्हणजेच एका सदनिकेच्या मागे रुपये 40 लाख नफा श्री. शरद पवार यांचे बंधू श्री. प्रताप पवार यांची कंपनी व चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला मिळणार आहे. भाजप डॉ. किरीट सोमैया यांनी या घोटाळ्याचे सगळे कागदपत्र, पुरावे आज पत्रकार परिषदेत रुजू केले.
आश्चर्याची बाब अशी की श्री. प्रताप पवार यांची निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे शेअर कॅपिटल फक्त रुपये 1 लाख आहे. परंतु या कंपनीत 2021 मध्ये 19 मार्च 2021 रोजी सिरम इन्स्टिट्युटने रुपये 435 कोटी 6% व्याज या दराने वीस वर्षासाठी या कंपनीत प्रेफरेन्स शेअर कॅपिटल म्हणून गुंतवले आहेत. या कंपनीने कोविड वॅक्सीन बनविले होते, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे.
रुपये 1 लाखाचे शेअर कॅपिटल श्री. प्रताप पवार व त्यांच्या पत्नीची त्याच्यासमोर रुपये 435 कोटीचे गुंतवणूक 6% दराने सिरम इन्स्टिट्युट यांनी केली आहे.
रुपये 100 कोटीच्या गुंतवणूकीच्या समोर रुपये 1000 कोटीचा भांडूप PAP घोटाळ्याचा फायदा/लूट चोरडिया यांचे न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला करण्यात Neo Star Infra projects कंपनीही सहभागी झाली आहे.
या PAP घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी पुन्हा डॉ. किरीट सोमैया यांनी केली आहे.
सचिव