आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्याबाबत झालेल्या आरोपासंदर्भात आदिवासी विकास विभागाने केला खुलासा
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्याबाबत झालेल्या आरोपासंदर्भात आदिवासी विकास विभागाने केलेला खुलासा पुढील प्रमाणे….
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याना सुगंधी दुध 200 मि. ली. (टेट्रापॅक) पुरवठ्याबातच्या खरेदीबाबतची टिपणी.
आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, दिनांक 30.12.2020 मधील तरतुदीनुसार सुगंधी दुध पुरवठ्याबाबत तरतुद आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा ह्या अतिदुर्गम भागात असल्याने तेथे दररोज दुध पुरवठा करणे शक्य नसल्याने टेट्रापॅक मध्ये सुगंधी दुध पुरवठा करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सदर निविदेचे मुल्य ठरवतांना टेट्रापॅक उत्पादन करणारे उत्पादक (डेअरी) तसेच महानंद डेअरी तसेच इतर नामांकित उत्पादकांकडून दर प्राप्त करुन घेण्यात आले होते. त्यानुसार सदर दरांची सरासरी रु. 27.70 प्रती 200 मी. ली. टेट्रापॅक इतका दर निश्चित केला होता.
खरेदी धोरणानुसार पार पडलेल्या निविदाप्रक्रियेत एकूण सहभाग घेतलेल्या पात्र निविदाकारांचा तपशिल व त्यांनी नमूद केलेले दर खालीलप्रमाणे आहे.
अ.
क्र. |
अपर आयुक्त निहाय | निविदाधारकांचे नांव | अपर आयुक्त निहाय न्युनतम दर रु. | अपर आयुक्त निहाय न्युनतम दरधारक संस्था | ||||
इंदापुर डेअरी ॲन्ड मिल्क प्राडक्टस् लि. पुणे | श्री. वारणा सहकारी दुध उत्पादक संघ लि. कोरेनगर कोल्हापुर | महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्या. मुंबई | पराग मिल्क फुडस् लि. पुणे | कर्नाटका को–ऑपरेटीव मिल्क प्रोडयुसर फेडरेशन लि. बॅग्लोर | ||||
200 मि.ली. प्रती पॅकेट दर रु. | ||||||||
1 | नाशिक | 29.20 | 29.10 | 33.38 | 28.60 | 28.60 | 28.60 | कर्नाटका को-ऑपरेटीव मिल्क प्रोडयुसर फेडरेशन लि. बॅग्लोर / पराग मिल्क फुडस् लि. पुणे |
2 | ठाणे | 29.00 | 28.90 | 33.38 | 28.70 | 29.30 | 28.70 | पराग मिल्क फुडस् लि. पुणे |
3 | अमरावती | 29.40 | 29.00 | 33.38 | 29.30 | 29.70 | 29.00 | श्री. वारणा सहकारी दुध उत्पादक संघ लि. कोरेनगर कोल्हापुर |
4 | नागपुर | 28.80 | 29.10 | 33.38 | 29.50 | 29.80 | 28.80 | इंदापुर डेअरी ॲन्ड मिल्क प्राडक्टस् लि. पुणे |
उक्त तपशिलानुसार 5 निविदाकारांपैकी 4 निविदाकारांचे दर अपर आयुक्त निहाय न्युनतम आहेत व महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्या. मुंबई यांचे दर जास्त होते. न्युनत दरधारक यांचेशी वाटाघाटी करुन सर्व अपर आयुक्त निहाय एकच दर रुपये 26.25 प्रति 200 मि. ली. टेट्रापॅक असा निश्चित करण्यात आला होता. दिनांक 12.01.2024 रोजी चारही पुरवठाधारक यांना अपर आयुक्त निहाय पुरवठा आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. यानुसार टेट्रापॅक दुधाची रु. 131.25 प्रती लीटर अशी होते. यामध्ये सर्व कर व अति दुर्गम भागातील 497 आश्रमशाळा स्तरावर पोहोच आहेत.
सदर निविदेत महानंद डेअरी यांनी देखील सहभाग घेतला होता. तथापि महानंद डेअरी यांचे दर जास्त होते. त्यामुळे न्युनतम दरधारक यांचेशी अजुन वाटाघाटी करुन सदर दर रु.26.25 निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे महानंद डेअरी व न्युनतम दरधारक यांचे दरामधील फरकानुसार रु. 33 कोटी रुपयाची शासनाची बचत झालेली आहे. तसेच उक्त खरेदी प्रक्रिया शासन निर्णय उद्योग उर्जा व कामगार विभाग दिनांक 01.12.2016 मध्ये विहीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करुन राबविण्यात आली आहे.
शासकीय आश्रमशाळेतील विदयार्थ्यांना वाटप करण्यात येत असलेले सुगंधी दुध यामध्ये Homogenized & Pasteurized Milk Fat % -3.0 to 3.5 S.N.F. %-8-5 Min Meeting FSSAI Standard of flavoured milk असा दर्जा ठेवण्यात आला आहे. विभागामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणारे सुगंधी टेट्रापॅक मधील दुध हे आहेत त्या स्थितीत पॅकेट फोडुन तात्काळ पिण्यास योग्य व पोषणमुल्य असलेला आहे. बाजारात उपलब्ध असलेले टेट्रापॅक हे 1 लिटर मध्ये आहे तसेच ते सुगंधी दुध आणि पिण्यास तात्काळ उपलब्ध होईल अशा स्वरुपात नाही. तरी निविदेत विहीत केलेल्या स्पेशिफीकेशनचे सुगंधी दुध विद्यार्थ्यांना तात्काळ उपलब्ध व पिण्यास योग्य असून विद्यार्थी सदर दुध आवडीने पितात.