SRA घर 5 वर्षांनंतर विकणे शक्य


मुंबई : SRA- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात आलेली घरे पुढील काळात पाच वर्षांनी विकता येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्विक विधेयक 2023 मंजूर करण्यात आलं असून त्या अंतर्गत आता झोपुप्रा सदनिकांची विक्री ही पाच वर्षांनंतर करणे शक्य होईल
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत घरे यापूर्वी 10 वर्षांनंतर विकण्याचा नियम होता. हा नियम बदलून आता 5 वर्षे करण्यात आला आहे. याबाबतचे महाराष्ट्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास ) (दुसरी सुधारणा) विधेयक 2023 विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात नागपूर येथे मंजूर झाले असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
SRA घरांच्या विक्रीबाबत कालावधी कमी करण्याची मागणी मागील अनेक वर्षा पासून मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि संस्थे मार्फत करण्यात येत होती. शिवसेना नेता माजी मंत्री आमदार अनिल परब यांनी हा विषय नागपूर अधिवेशनात लावून धरला होता. तसेच पत्रकार-माहीती अधिकार कार्यकर्ता अजय वजरकर, सामाजिक कार्यकर्ता राजू भाऊ तोडणकर, भंडारी समाज प्रतिष्ठान सचिव दीपक अनंत नार्वेकर, साई प्रेरणा संस्था अध्यक्ष ज्ञानेश गुरव, शिवतेज प्रतिष्ठान चे उदय पिंपळे, समाजसेवक संघर्ष समिती चे चंदकांत रेडकर, वकील अर्पिता वजरकर, मनसे चे गीतेश खेडेकर, व्यापारी मंडळ चे शंकर वजरकर, समाजसेवक संदिप पाटील, माहीती अधिकार कार्यकर्ता संजय मोर व इतर यांनी ही प्रयत्न केले होते त्या आधारे महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. ह्याचाच अर्थ कोणतेही जनहितार्थ / सकारात्मक कार्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर ते शासनाला मान्य करावे लागते. तसेच अनेकांनी सदर विषयात प्रयत्न केले आहेत त्यांचे ही भारत सत्य न्यूज आभारी आहे.