पालिकेला सुबोध ठाणेकर यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी मनसेचे निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
जनहित कक्ष व विधी विभाग

सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,माननीय किशोर शिंदे साहेब अध्यक्ष . जनहित विधि विभाग. यांच्या सूचनेनुसार तसेच मा.अर्चित साखळकर साहेब. मा.सुनिता चुरी मॅडम. माननीय मोहनसिंग चौहान साहेब. मा. अजय दाभोळकर साहेब. मा. भाऊसाहेब गीते साहेब श्रीमती निलेशा खराते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. महेश जयराम पालांडे तालुका संघटक यांच्या नेतृवाखाली ठाणे मनपाच्या कळवा प्रभागातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी भाजपचे आमदार संजय केळकर तसेच स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नागपूर येथील अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडल्यानंतर ठाणे महापालिकेने निलंबनाऐवजी सक्तीच्या रजेवर पाठवून हेच सुबोध ठाणेकर ४५ दिवसांच्या सक्तीच्या रजेनंतर वसई विरार पालिकेत प्रतिनियुक्तीवर रुजू झाले असून प्रभाग समिती आय चा पदभारही सोपविण्यात आलेला आहे. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभाग यांच्या वतीने मा. आयुक्त साहेब वसई विरार शहर महानगरपालिका. यांना निवेदन मार्फत आपला निषेध व्यक्त करत सदर नियुक्ती रद्द करा अशी मागणी जनहित विधी विभाच्या वतीने धरली आहे. मा अतिरिक्त आयुक्त यांना या विषयावर सविस्तर बोलन करून योग्यती कार्यवाही करता येईल असं संगीतलं असल तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विधी विभाग या विषयाची पाठवपुरावा करणार सांगण्यात आले. सदर निवेदन देते वेळी मा. श्री.अजय दाभोळकर महाराष्ट्र उपाध्यक्ष, मा.श्री. महेश जयराम पालांडे वसई तालुका,मा. श्री.अंकुश गुरव उप शहर संघटक, मा. श्री.गणेश पुटक उपविभाग संघटक, सौं. अश्विनी पांचाळ उप शहर संघटक, सौं सारिका बच्चार विभाग संघटक, सौं अंजना सावंत विभाग सचिव,सौं दीपिका काजारे शाखा संघटक, सौं. दिव्या बुरुनकर,उप शाखा संघटक ,सौं पूजा चौहान महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button