महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, वसई विरार जिल्हा आयोजित भव्य पद नियुक्ती सोहळा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना , वसई विरार जिल्हा आयोजित भव्य पद नियुक्ती सोहळा
विरार : 6/11/2023: दि ०५ नोव्हेंबर रोजी विरार पूर्व येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, वसई विरार जिल्ह्या मार्फत भव्य पद नियुक्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याचे प्रमुख अतिथी , युवा मनसे नेता , महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष सन्मा श्री अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते २५० पेक्षा जास्त युवकांना मनविसे पद नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. यावेळी भव्य बाईक रॅली चे देखील आयोजन करण्यात आले होते.
ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांचा उत्साह पाहायला मिळाला. अनेक विद्यार्थी, युवक ह्या सोहळ्यात सामील झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजक मनविसे वसई विरार जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र अग्रवाल व मनविसे जिल्हा संगटक आश्विन परब यांनी श्री अमित साहेब ठाकरे आणि मनसे सरचिटणीस श्री कीर्तिकुमार शिंदे आणि मनविसे सरचिटणीस श्री अखिल चित्रे यांचे स्वागत केले आणि आभार मानले. तसेच कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव आणि वसई विरार शहर अध्यक्ष श्री प्रवीण दादा भोईर यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच ह्या कार्यक्रमासाठी प्रामाणिक मेहनत घेणाऱ्या सर्व विद्यमान पदाधिकारी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
येणाऱ्या काळात मनविसे वसई विरार जिल्ह्यांमार्फात विद्यार्थी न्याय हक्कांसाठी आणि त्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक ते कार्य हाती घेण्यात येईल असे आश्वासन जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र अग्रवाल यांच्या तर्फे देण्यात आले.
…