कशासाठी ओबीसी मधून आरक्षण पाहिजे.? – उमेश शिंदे
कशासाठी ओबीसी मधून आरक्षण पाहिजे.? तर खाली दिलेल्या फोटोमध्ये उभं असलेल्या या दोन लोकांच्या मधली गॅप भरून काढण्यासाठी पाहिजे OBC मधून आरक्षण..
खालील फोटो निट पहा…
आज पुण्यात जरांगे पाटलांच्या सभेला नेहमीप्रमाणे मराठासेवक ( स्वयंसेवक ) जबाबदारी पार पाडताना मी आणि शेजारी एक PSI साहेब बंदोबस्थाची जबाबदारी पार पाडताना….फोटो टाकण्यास कारण की, 2010 चे साल होते मी नुकताच ग्रॅज्युइट झालेलो, मित्रांसोबत अभ्यास करत लगेचच MPSC ची तयारी केली आणि PSI ची exam दिली.. नशीब म्हणा किंवा अभ्यासामुळे म्हणा माझे पहिल्याच प्रयत्नात प्री क्लेर होऊन mains ला मला चांगले मार्क्स पडले.. मला 100 % खात्री झाली की आता मी PSI होणार… मला 481 मार्क पडले…. थोड्याच दिवसात मेरिट लिस्ट लागली cut off आला..
Open = 484
OBC = 476
अर्थातच मराठा open मधे असल्यामुळे मला 3 मार्क साठी पोस्ट गमवावी लागली.. आणि माझ्या पेक्षा 5-10 मार्क्स कमी असलेले सगळे जन PSI सिलेक्ट झाले आणि मी मात्र आजही आंदोलनकर्ता म्हणून सिलेक्ट झालो…. जे हे सगळं माझ्या बाबतीत घडले ते माझ्या लेकराबाळाना आणि संपूर्ण मराठा समाजाला झेलावं लागू नये म्हणून मी पण जरांगे पाटलांसोबत शांततेच्या मार्गाने 50% च्या आत OBC मधून आरक्षणासाठी लढत आहे.. हा लढा तुमचा आमचा सर्वांचा आहे आपली एकी तुटण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत पण आपण एकजूटीनेच लढा देऊ आणि जरांगे पाटलांच्या सोबत ताकतीने उभे राहू….
उमेश जगन्नाथ शिंदे, 9595956004, कातवडी (मुळशी ) पुणे. #मराठाआरक्षण
***