पणजी मध्ये 10 जानेवारी रोजी गोवा विभागाच्या पोस्टल पेन्शन अदालतचे आयोजन


1 जानेवारी पर्यंत तक्रारी दाखल करता येणार
टपाल खात्यातून सेवा निवृत्त झालेल्या अथवा सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला आहे, अशा सर्व निवृत्तीवेतन धारकांच्या पेन्शन (निवृत्ती वेतन) अथवा निवृत्ती वेतन लाभांशी संबंधित तक्रारींचे या पेन्शन अदालत मध्ये निराकरण केले जाईल. ज्या निवृत्तीवेतनधारकांचे प्रश्न, तक्रार दाखल केल्यापासून तीन महिन्यांमध्ये सोडवले गेले नाहीत, ते या संधीचा लाभ घेऊ शक्तील.
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण (CAT), अथवा न्याय प्रविष्ट प्रकरणे, वारसाहक्क विवाद आणि धोरणात्मक बाबींशी निगडित तक्रारी यासारख्या पूर्णपणे कायदेशीर बाबींचा समावेश असलेली प्रकरणे पेन्शन अदालत मध्ये हाताळली जाणार नाहीत.
निवृत्तीवेतन धारकांनी त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, 01 जानेवारी 2024 पर्यंत महेश एन., लेखाधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, O/o पोस्टमास्टर जनरल, गोवा प्रदेश, पणजी- 403001 यांच्याकडे आपला अर्ज पाठवावा, अथवा पुढील पत्त्त्यावर ईमेल करावा: accts.goa@indiapost.gov.in
मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज पेन्शन अदालत साठी विचारात घेतले जाणार नाहीत.