ओंबळी बौध्दवाडी च्या विहिरीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा-आमदार भरतशेठ गोगावले


गाव -ओंबळी , ता – पोलादपूर , जिल्हा – रायगड. : (भारत सत्य) : सदर गावच्या बौध्दवाडी च्या विहिरीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. सरकार दरबारी तक्रार करून तो निकाली निघत नव्हता. त्यामूळे स्थानिक लोकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. याचं मुद्द्याला घेवून ओंबळी गावच्या बौध्द वाडीतील कार्यकारणी व सभासद स्थानिक आमदार, उत्कृष्ट लोक प्रतिनिधि , उत्तम नेतृत्व असलेले माननीय भरत शेठ गोगावले साहेब यांना मंत्रालय या ठिकाणी भेटले व विहिरीची समस्या सांगितली. संपूर्ण आढावा घेवून आमदार साहेबांनी वचन दिले की येत्या दोन महिन्यांत आपली विहीर बांधून पूर्ण होईल व तिथेच अधिकारी वर्गाला पण सांगितले कि ओंबळी बौध्दवाडी च्या विहिरीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, जो निधी लागेल तो उपलब्ध करावा. सदर निर्णयाने संपुर्ण गावात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
असं बौध्दजन सेवा संघ ओंबळी, या संघटनेचे सचिव व प्रवक्ता अनिल जाधव व सुबोध शिर्के यांनी सांगितले आहे. आमदार साहेबांना भेटण्यास गेलेले मंडळी टी के शिर्के, भास्कर कासारे, डी एम कासारे, वैभव कासारे, नागेश शिर्के, सिद्धार्थ शिर्के, सुनिल जाधव, राजेंद्र शिर्के, मनिष शिर्के, सचिन शिर्के, ऍड प्रफुल शिर्के, अनिल जाधव , सुबोध शिर्के, सुनिल चिकणे. वरील उपस्थितांनी आमदार साहेबांना धन्यवाद दिला , त्यांचें आभार मानले व बैठकीची सांगता झाली.