पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजना सुरू करत आहे.

मुंबई : 8/1/2024 : भारत सत्य:  भारतीय डाक संपूर्ण देशभरात पोस्टल सुविधांसाठी सार्वत्रिक सेवाप्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जरीही भारतामध्ये 1.55 लाख टपाल कार्यालयासहित जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क आहे, ज्यात 89% टपाल कार्यालये ग्रामीण भागात आहेत, तरीही पोस्ट ऑफिसची मागणी कायम आहे. विशेषत: नव्याने विकसित
होणाऱ्या शहरी भागात अधिक पोस्ट ऑफिस उघडण्याची ग्राहकांकडून सतत मागणी होत आहे.

याची पूर्तता करण्यासाठी टपाल विभाग, पोस्ट ऑफिस फ्रँचायझी आउटलेट्स स्थापन करण्यासाठी
1 फेब्रुवारी 2024 पासून नवीन फ्रँचायझी योजना सुरू करत आहे.

SRA घर 5 वर्षांनंतर विकणे शक्‍य

SRA घर 5 वर्षांनंतर विकणे शक्‍य

फ्रँचायझी आउटलेटद्वारे कोणत्या सेवा दिल्या जातील ?
• आंतर्देशीय स्पीड पोस्टचे बुकिंग, नॉन-सी.ओ.डी. (Non Cash on delivery) (कागदपत्रे आणि पार्सल),
आंतर्देशीय नोंदणीकृत पत्रे, ई-मनी ऑर्डर.
• टपाल तिकीट आणि स्टेशनरी विक्री
• रेव्हेन्यू स्टॅम्पची विक्री, केंद्रीय भरती फी स्टॅम्प इत्यादीसह किरकोळ सेवा.
• पोस्टल लाइफ इन्शुरन्स उत्पादनांसाठी थेट एजंट म्हणून काम करणे आणि प्रिमियम संकलनासह
विक्रीनंतरची संबंधित सेवा प्रदान करणे.
फ्रँचायझी कसे व्हावे ?
• फ्रँचायझीसाठी अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
• व्यक्ती तसेच इतर संस्था जसे की कोपर्‍यावर असलेले दुकान, पानवाला, किराणावाला, स्टेशनरी दुकाने,
छोटे दुकानदार इ.
• वय: 18 वर्षांपेक्षा जास्त. उत्पादनांच्या श्रेणीचे व्यवस्थापन आणि विपणन करण्याची क्षमता असलेल्या
व्यक्तींची निवड करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन उच्च वयाची निवड निश्चित केलेली नाही.
• सदर व्यक्ती / संस्था भारतीय डाक विभागासोबत करार करेल.
• शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शाळेतून 10वी उत्तीर्ण. स्थानिक भाषा आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असलेली
व्यक्ती; संगणक साक्षरता; स्मार्ट फोनचे कार्य ज्ञान; वैध पॅन क्रमांक – फ्रँचायझी होण्यासाठी अर्ज करू शकतात.
• अर्जदाराला पोस्ट ऑफिसमध्ये सुरक्षा ठेव म्हणून रु. 10,000/- जमा करावे लागतील.
फ्रँचायझीसाठी कमिशन :
फ्रँचायझींना प्रत्येक नोंदणीकृत पत्रासाठी रू. 3.00, रु. 200/- पेक्षा जास्त मूल्याच्या प्रत्येक मनीऑर्डरसाठी रू.
5.00, टपाल तिकीट आणि स्टेशनरीच्या विक्रीवर 5% इतके कमिशन मिळेल.
बुक केलेल्या स्पीड पोस्ट साठी कमिशन दर अतिशय आकर्षक आहे आणि फ्रँचायझी त्याच्याद्वारे केल्या
गेलेल्या मासिक व्यवसायाच्या 7% ते 25% इतकी रक्कम मिळेल.

निवड निकष :
टपाल विभागीय प्रमुख हे फ्रँचायझीला संलग्न / नियुक्त करण्यासाठी सक्षम अधिकारी असतील.
अधिक माहितीसाठी कृपया mhfranchisee@gmail.com वर ईमेल पाठवा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button