मराठी पाट्यां संदर्भात अंधेरी पोलीस स्टेशन येथे महत्वाची मनसे चर्चा


मुंबई : मराठी पाट्यांच्या मुद्द्या संदर्भात अंधेरी पोलीस स्टेशन येथे महत्वाची चर्चा झाली यामुळे महानगरपालिकेने दोषी दुकानदारांवर कार्यवाही सुरू केली आहे. तसेच येत्या ०४ डिसेंबर 2023 पर्यंत आस्थापनांवरती मराठी पाट्या न लावल्यास अंधेरी विभागातील ज्या दुकानांवरती इंग्रजी पाट्या असतील त्या सर्व पाट्यांना काळे फासण्याचे काम आम्ही करू असा इशारा मनसे चित्रपट कर्मचारी सेना(सयुक्त सर चिटणीस) विशाल हळदणकर यांनी दिला आहे. याप्रसंगी मनसे चित्रपट कर्मचारी सेना (चिटणीस) मंगेश परब, (चिटणीस) राकेश गुरव, (चिटणीस) रोहित बेंद्रे ,शाखा अध्यक्ष ८४ चे वल्लब मोरे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.