एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी उपक्रमाअंतर्गत श्रमदान
“स्वच्छता ही सेवा” उपक्रम अंतर्गत एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी या संकल्पनेतून आज दवडीपार बाजार येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील दुतर्फा रस्त्यावरील अनावश्यक कचरा, घाण जमा करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली आणि परिसरातील जागेची स्वच्छता करण्यात आली.
ग्रामपंचायत दवडीपार (बाजार) येथील सरपंच मा.राजकिरण मेश्राम यांच्या पुढाकारातून महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ग्रामस्थांच्या सहभागातून गावातील स्वच्छता कार्य हाती घेतले जाते. गावातील तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गटाच्या सदस्य, गावातील युवा वर्ग गावासाठी श्रमदान करुन या कार्यात आपले विशेष योगदान देतात.
यावेळी युवा वर्ग, आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. विशेषतः दवडीपार बाजार गावचे सुपुत्र, सर्वांचे परिचित बालरोग तज्ञ मा.डॉ.यशवंत लांजेवार, ग्रामपंचायत सदस्य पंकज धुर्वे, प्रमोद गोस्वामी, संदीप ढोक, जि.प.प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंद आणि गावातील तरुण वर्गांनी प्रामुख्याने उपस्थित राहून गावासाठी या कार्यात आपले विशेष योगदान दिले.