मोजमाप पुस्तिका गहाळ प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. 21 : धाराशिव नगरपालिकेतंर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
धाराशिव नगरपालिकेतंर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य नरेंद्र दराडे यांनी सहभाग घेतला होता.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्या प्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई आणि चालढकल होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी केली जाईल.