रंगाहरि यांच्या निधनामुळे हिंदुत्वविचार परिवाराचे नुकसान : सुधीर मुनगंटीवार

रंगाहरि यांच्या निधनामुळे हिंदुत्वविचार परिवाराचे नुकसान : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरदि.  31 ऑक्टोबर २०२३:  रा. स्व.  संघाचे दुसऱ्या पिढीतील ज्येष्ठ प्रचारक व भूतपूर्व अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. श्री.  रंगाहरि जी (९३) यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने हिंदुत्वविचार परिवाराचे मोठे नुकसान झाले आहेअशा शब्दात राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री  ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री रंगाहरि जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ते पुढे म्हणाले कीरा. स्व. संघाचे अ. भा. बौद्धिक प्रमुख व थोर विचारवंत ( Think Tank) म्हणून ते सुपरिचित होते. हृदयाला थेट भिडणारे, सतत ऐकत राहावे असे त्यांचे बौध्दिक वर्ग असायचे. संघाच्या सहापैकी पाच सरसंघचालकांसोबत त्यांनी काम केलं होतं. दक्षिण भारतात संघ विस्तारात त्यांची प्रमुख भूमिका होती.

त्यांची मातृभाषा मराठी नव्हती पण तरीही साने गुरुजींच्या कविता त्यांना तोंडपाठ होत्या. खरा तो एकची धर्म आणि बलसागर भारत होवो याव्यतिरिक्त आपल्याला माहिती नसलेल्या अनेक मराठी  कविता ते अस्खलित गात होते.

मा. श्री.  रंगाहरी जी एक अत्यंत समर्पित व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने हिंदुत्व विचारांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवोमा. रंगाहरीजीं यांना मी विनम्र श्रद्धांजली वाहतो, असे श्री मुनगंटीवार म्हणाले.

Related Articles

Back to top button