नागपूर शासकीय दंत रुग्णालयांमधील ऑनलाइन सेवा सुरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
नागपूर दि.16 : नागपूरसह राज्यातील वैद्यकीय, दंत व आयुष महाविद्यालयांमध्ये शासनाने 11 जुलै 23 रोजीच्या आदेशान्वये रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली ही ऑनलाइन सेवा सुरू करण्यास मान्यता प्रदान केली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिली.
नागपूर शासकीय दंत रुग्णालयांमधील ऑनलाइन सेवा सुरू करण्याबाबतचा प्रश्न सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, नागपूर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात ऑनलाइन सेवा सुरू करून बंद पडलेल्या सोयीसुविधांसाठी गव्हर्न्मेट मार्केट प्लेस अर्थात जेम (GeM) पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया लवकरच आयुक्तस्तरावरून राबविण्यात येत आहे.