राज्यपालांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन
संविधान दिन: राज्यपालांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन
मुंबई, दि. 26: भारतीय संविधान दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.
दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त राज्यपालांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.
भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधींची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रतीवर्धित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.