डिलाईल पुलाचे लोकार्पण आणि सरकत्या जिन्याचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते.


मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार!
मुंबई : दक्षिण मुंबईतील लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील डिलाईल पुलाचे लोकार्पण आणि सरकत्या जिन्याचे भूमिपूजन करण्यात आले. या पुलामुळे दक्षिण मुंबईतील प्रवासासाठी नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी मुंबईचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर जी मुंबई उपनगरचे पालक मंत्री श्री मंगल प्रभात लोढा जी , मुंबई भाजपाचे अध्यक्ष श्री आशिष शेलार जी , आमदार श्री कालिदास कोळंबकर जी , आमदार सदा सरवणकर जी , आमदार सुनील शिंदे जी माजी आमदार किरण पावसकर जी , व चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्री सुशांत शेलार जी तसेच शिवसेना-भाजपाचे मा. नगरसेवक दत्ता नरवणकर , मा नगरसेवक समाधान सरवणकर ,मा नगरसवेक संतोष खरात
व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
….