खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ केवीआयसी नागपूर कार्यालयाव्दारे लाभार्थ्यांना मशिनरी आणि टुलकीटचे वितरण
नागपूर 12 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय सूक्ष्म,लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ -केवीआयसी नागपूर विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत वर्धेच्या गोपुरी स्थित खादी संस्था ग्रामसेवा मंडळमध्ये ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत मशिनरी आणि टुलकीट वितरणाचा कार्यक्रम केवीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार , वर्ध्याचे खासदार रामदास तडस, आमदार डॉ . पंकज भोयर यांच्या उपस्थितीत पार पडला . याप्रसंगी लाभार्थ्यांना 155 टूलकिटचे आणि मशिनरीचे वितरण करण्यात आले.
या वितरण कार्यक्रमाला संबोधित करताना केवीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात ‘वोकल फॉर लोकल’ ची क्रांती सुरू आहे. या क्रांतीचा सर्वाधिक फायदा खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांना होत आहे. गेल्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील खादी भवनात एकाच दिवसात 1.52 कोटी रुपयांची खादी उत्पादने विकली गेली, ही बाब भारतातील लोक त्यांना त्यांच्या स्थानिक उत्पादनांची आवड असल्याची साक्ष देत असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.
केवीआयसी विभागीय कार्यालय नागपूर अंतर्गत विदर्भातील वर्धा, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली जिल्ह्यांतील 40 लाभार्थ्यांना वेस्टवुड क्राफ्ट मशीन, 75 कारागिरांना लेदर रिपेअरिंग टूलकिट, 20 कारागिरांना कागदी पत्रके आणि डोना मॅन्युफॅक्चरिंग टूलकिट , 20 कारागिरांना प्लंबिंग टूल्सचे वाटप करण्यात आल्याची माहिती कुमार यांनी दिली . पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत, आर्थिक वर्ष 2021 पासून आतापर्यंत, सुमारे 57 कोटी रुपयांची मार्जिन मनी सबसिडी 2,249 युनिट्सना वितरित करण्यात आली आहे असून याद्वारे 15,747 नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. विभागीय कार्यालय नागपूर अंतर्गत 17 खादी संस्था कार्यरत असून त्याद्वारे 945 खादी कारागिरांना रोजगार मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला संबोधित करताना वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी खादी हा एक ‘ग्लोबल ब्रँड’ बनत असल्याचं मत व्यक्त केलं . याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे त्याचप्रमाणे ग्रामोद्योग त्याचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
या वितरण कार्यक्रमानंतर मनोज कुमार यांनी महात्मा गांधी ग्रामीण उद्योग संशोधन संस्था – एमगिरी वर्धा येथे समीक्षा बैठक देखील घेतली .
S.Rai/D.Wankhede/P.Kor
********