शिल्पा ठाकरे, मणिराज पवार, रोहन गुजर, साक्षी गांधी यांची ‘सन मराठी’ची नवी मालिका ‘नवी जन्मेन मी’ ६ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

शिल्पा ठाकरे, मणिराज पवार, रोहन गुजर, साक्षी गांधी यांची ‘सन मराठी’ची नवी मालिका ‘नवी जन्मेन मी’ ६ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : 3/11/2023 :आपल्या विचारांवर ठाम राहून दुनियेशी दोन हात करणारी शिल्पा ठाकरे म्हणतेय ‘नवी जन्मेन मी’; ‘सन मराठी’ची नवी मालिका ६ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

अल्लड, गोड, बिनधास्त, जगाच्या दबावाखाली न बदलता, जगाला बदलायला लावणा-या शिल्पा ठाकरेची टिव्हीवर एंट्री; ‘सन मराठी’ची नवी मालिका ‘नवी जन्मेन मी’ ६ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या विचारांवर ठाम राहून दुनियेशी दोन हात करणार-या नायिकेची कथा मराठी टेलिव्हिजनवर मांडणे किती विशेष असेल ना… आणि नेहमीप्रमाणे विशेष कथा, नवीन विषय मांडण्यासाठी पुन्हा एकदा ‘सन टीव्ही नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीने पुढाकार घेतलेला आहे. ‘सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असणा-या या वाहिनीवरील ‘नवी जन्मेन मी’ या नवीन मालिकेचा प्रवास ६ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे.

कोण म्हणतं फक्त शहरातल्याच मुली धीट आणि बिनधास्त असतात, गावाकडच्या मुलींमध्ये सुध्दा जगाशी दोन हात करण्याची ताकद असते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्वानंदी’. ‘सन मराठी’वरील ‘नवी जन्मेन मी’ या नव्या मालिकेत गावात राहणा-या एका बिनधास्त, अल्लड, जगाच्या दबावाखाली न बदलता जगालाच बदलायला लावणा-या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या जिद्दी, सर्वांच्या मनाचा अचूक ठाव घेणा-या भूमिकेचं नाव आहे स्वानंदी आणि ही प्रमुख भूमिका अभिनेत्री शिल्पा ठाकरे साकारणार आहे.

स्वानंदी उर्फ शिल्पा ठाकरेचा या मालिकेत गाव ते शहर असा प्रवास दाखवण्यात येणार आहे. करियरच्या निमित्ताने गावाकडून शहरात आलेल्या स्वानंदीला नवीन जागेसोबत, शहरी वातावरणात कसं जुळवून घ्यावं लागणार आहे, त्यामध्ये आलेल्या चॅलेंजेसला कसं सामोरं जावं लागणार आहे, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्वानंदीचा स्वत:वर असा विश्वास आहे की, ती जगाला बदलू शकते, पण तिच्या याच स्वभावामुळे तिला काय काय अनुभवावं लागेल हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

तसेच या मालिकेत मणीराज पवार, रोहन गुजर आणि साक्षी गांधी या कलाकारांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. मणीराज पवार यामध्ये ‘मणी’ ची भूमिका साकारतोय जो अतिशय शांत, समजूतदार, कामसू, दुसऱ्यांना मदत करणारा आणि उपकारांची जाणीव असणारा मुलगा आहे. या मालिकेतील ‘सुजित’ या भूमिकेत अभिनेता रोहन गुजर दिसणार आहे. रोहनची भूमिका ही खुषालचेंडू. श्रीमंतीचा माज नसला तरी त्याचा पूर्ण उपभोग घेणारा, शातिर, बाबांच्या धाकात असणारा आणि आईला गुंडाळण्यात एक्सपर्ट, मुलींसाठी चार्मिंग बॉय असा हा सुजित. मालिकेचे दोन नायक भिन्न स्वभावाचे, ते समोरासमोर आले तर काय होईल हे पाहणं रंजक असणार आहे. या मालिकेतील आणखी एक अनोखं पात्रं म्हणजे ‘संचिता’. अभिनेत्री साक्षी गांधी साकारत असणारी ‘संचिता’ ही भूमिका महत्त्वाकांक्षी, चलाख आणि कुणाशी कसं वागावं याची जाणीव असणारी. या चारही भूमिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच सज्ज होणार आहेत.

नितीन वैद्य आणि निनाद वैद्य यांचे ‘दशमी क्रिएशन्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘नवी जन्मेन मी’ मालिकेचे दिग्दर्शन मिलिंद पेडणेकर,स्वप्नील शिवाजी वारके हे करणार असून अपर्णा पाडगांवकर,अभिजीत शेंडे यांनी कथा लिहिली आहे.

‘नवी जन्मेन मी’ मालिकेच्या निमित्ताने शिल्पा ठाकरेने छोट्या पडद्यावर दमदार एंट्री केली आहे. शिल्पाचे डोळे फार बोलके आहेत, तिच्या एक्सप्रेशन्समुळे ती लोकप्रिय ठरली. शिल्पाने खिचिक, ट्रिपल सीट, इभ्रत, प्रेमा, भिरकीट या सिनेमांत काम केले आहे. आता या मालिकेच्या निमित्ताने शिल्पा अल्लड, गोड स्वानंदीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, तिची ही भूमिका देखील प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री वाटते. त्यामुळे प्रेक्षकहो, शिल्पा ठाकरेची ‘नवी जन्मेन मी’ ही नवी मालिका नक्की पाहा येत्या ६ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी ७:३० वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button