जायगांवात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी


सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जायगांव गावात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी
सातारा : संजय पवार : 1/11/2023 : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जायगांव गावात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी असल्याचे फलक लावण्यात आला असून “चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष” मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही, त्यामुळे आपली मान मर्यादा राखुन गावात प्रवेश करावा, आजवर लढलो माती साठी एकदा लढा जातीसाठी या आशयाचा सकल मराठा समाज समस्त जायगांव गावच्या वतीने मारुती मंदिरासमोर भला मोठा फ्लेक्स बोर्ड लावत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्या पदाधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
..