भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
मुंबई, दि. 02 : देशभर 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे.
राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना, भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग, 91, सर पोचखानवाला मार्ग, वरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा ईमेल acbwebmail@mahapolice.gov.in, addlcpacbmumbai@mahapolice.in, फेसबुक www.facebook.com-maharashtra-