राज्य मागासवर्ग आयोगाचे मराठा समाजाच्या मागासलेपणा संदर्भातील सूचना पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास ५०० शब्दांच्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे दि. १९ जानेवारी २०२४ पर्यंत mscbcpune2@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात,असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.