मुंबईत फेब्रुवारी महिन्यात आयोजित महासंस्कृती महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 4 : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महासंस्कृती महोत्सवामध्ये सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम, प्रदर्शनीय दालनेही असणार आहेत. त्यासाठी इच्छुक संस्था, कलाकार संच/समूह/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था यांच्याकडून ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधितांनी अर्ज rdcmumbaicity@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा तहसीलदार तथा रचना व कार्यपद्धती अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रुम नं. १०७, पहिला मजला, जुने जकात घर, फोर्ट मुंबई- ०१ यांच्याकडे कार्यालयीन वेळेत पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या महोत्सवात आपल्या राज्यातील संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, कवितांचे कार्यक्रम व व्याख्याने, देशभक्तीपर गीते, जिल्ह्यातील स्थानिक सण, उत्सव आदीबाबत विविध कार्यक्रम आणि राज्य संरक्षित स्मारके आणि गडकिल्ले यांची माहिती सादर केली जाणार आहे.