वारणाली रुग्णालयातील सुविधांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी – मंत्री उदय सामंत


नागपूर, दि. 21 : सांगली- मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात विविध अत्याधुनिक सोयी -सुविधा कार्यान्वित करण्यासाठी तीन कोटी रुपये पुढील आठ दिवसांत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
या संदर्भात सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या वाढीव कामाकरिता महानगरपालिकेने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2024-25 च्या कृती आराखड्यामध्ये रुपये तीन कोटी एवढ्या रकमेचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान ,मुंबई यांच्याकडे सादर केला आहे. हा निधी प्राप्त करून घेण्यासाठी महानगरपालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.