अभिनेता किशोर महाबोले आणि शेखर फडके कला क्षेत्रातील ईशान्य मुंबई एक्सलेंस अवॉर्डचे विजेते सुपरस्टार अशोक सराफ यांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कार प्रदान


अभिनेता किशोर महाबोले आणि शेखर फडके कला क्षेत्रातील ईशान्य मुंबई एक्सलेंस अवॉर्डचे विजेते
सुपरस्टार अशोक सराफ यांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कार प्रदान
निकेत पावसकर ,तळेरे, दि. 31 : मुंबई उपनगरातील प्रतिष्ठेचा ईशान्य मुंबई एक्सलेंस अवॉर्ड्स सोहळा भांडुप येथे झाला. या सोहळ्याचे आयोजन ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येते. २०२३ वर्षाच्या ईशान्य मुंबई एक्सलेंस अवॉर्डचे विजेते अभिनेता किशोर महाबोले आणि शेखर फडके ठरले. दोन्ही पुरस्कार विजेत्यांचा सन्मान अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. हा कार्यक्रम तळेरे गावचे सुपुत्र अखिल भारतीय दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॉ. विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून झाला.
या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अखिल भारतीय दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॉ. विशाल कडणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमामध्ये अशोक सराफ यांनी पुरस्कार प्रदान करताना किशोर महाबोले आणि शेखर फडके या दोनही गुणी कलावंताचे कौतुक केले आणि त्यांच्या सोबत चित्रीकरण केलेल्या मालिका आणि सिनेमांच्या आठवणींना उजाळा दिला. किशोर महाबोले हे सध्या आई कुठे काय करते तर शेखर फडके हे नवा गाडी नवा राज्य ह्या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचले आहेत. दोनही मान्यवरांचे पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.