डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेबाबत अभिप्राय/शिफारशी पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 30 : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या लोकाभिमुख योजना, निर्णय, ध्येय-धोरणे, इत्यादींची माहिती विविध डिजिटल माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येतात. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला आहे.
डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा प्राथमिक मसुदा राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://maharashtra.gov.in/