आयुक्त इक्बाल चहल व ठाकरे सरकार यांनी भ्रष्ट पद्धतीने बांधकाम कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरला दिला ! – डॉ. किरीट सोमैया
मुलुंड “प्रकल्पग्रस्त पुनर्वसन” घोटाळा –
नवघर पोलीस स्टेशन मुलुंड पूर्व येथे डॉ. किरीट सोमैया यांची – डॉ. किरीट सोमैया
20/11/2023 : मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, देवनार…… येथील 50,000 लोकांचे स्थलांतर मुलुंड पूर्व केळकर कॉलेज जवळ करण्याच्या मुंबई महानगरपालिका / ठाकरे सरकार यांच्या घोटाळ्याच्या विरोधात आज नवघर मुलुंड पूर्व पोलीस स्टेशन येथे भाजपा डॉ. किरीट सोमैया यांनी तक्रार दाखल केली.
मुंबई महानगरपालिकेनी भ्रष्टरित्या, पारदर्शक पद्धतीने, गैरकायदेशीररीत्या 7439 सदनिकांचे बांधकाम करण्याचा कॉन्ट्रॅक्ट ईस्ट पुणे रियालिटी एलएलपी या चोरडिया यांच्या कंपनीला दिला आहे. चोरडिया यांना रु. 3,500 कोटींचा निव्वळ नफा लूट मिळणार आहे.
22 मार्च 2022 रोजी ठाकरे सरकार व मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक श्री. इक्बाल चहल यांनी भ्रष्ट पद्धतीने हा कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरला दिला.
मुंबई महानगरपालिकेच्या 28/07/2020 रोजीच्या पत्राप्रमाणे मानखुर्द पूर्व (एम/पूर्व) आणि मानखुर्द पश्चिम (एम/पश्चिम) येथून 6,000 परिवारांचे पुनर्वसन केळकर कॉलेज जवळ करण्यात येणार आहे.
मुलुंड पूर्वची सद्याची लोकसंख्या 1 लाख यात या 50,000 लोकांची भर होणार यात 25,000 बांगलादेशी असणार.
महापालिकेच्या या घोटाळ्या विरुद्ध महापालिका अधिकारी, ठाकरे सरकारचे अधिकारी व ईस्ट पुणे रियालिटी एलएलपी या कंपनीचे चोरडिया यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 406, 408, 409, 420, 120 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी डॉ. किरीट सोमैया यांनी मागणी केली आहे.
डॉ. किरीट सोमैया यांच्या सोबत पूर्व नगरसेवक डॉ. नील सोमैया, श्री. राहूल बाणावली, श्री. अजित दळवी….. उपस्थित होते.