सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील पात्र उमेदवारांना आवाहन
मुंबई, दि. ८ : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अधिनस्त विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, पुणे विभागांतर्गत निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सहकार आयुक्त यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज केलेले उमेदवार व्यावसायिक चाचणी परीक्षा कोणत्या माध्यमातून (मराठी/इंग्रजी) देणार आहेत, याबाबतचा तपशील भरण्यासाठी दि. ५ ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी लॉगिन करून, टॅब्स ओपन करुन व्यावसायिक परीक्षेचे भाषा माध्यम नोंदवावे, असे आवाहन योगीराज सुर्वे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग, पुणे यांनी केले आहे.