आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतिशक्ती जिल्हास्तरीय कार्यशाळेचे ९ फेब्रुवारी रोजी आयोजन

मुंबई, दि. ७ : उद्योग संवर्धन एवं आंतरिक व्यापार विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या ३ राज्यातील ११ आकांक्षित जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र (४), गुजरात (२) आणि राजस्थान (५)] दि.९ फेब्रुवारी, २०२४ रोजी यशदा, पुणे, येथे दुसऱ्या प्रधानमंत्री गतिशक्ती जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे नियोजन विभागाने कळविले आहे.

राज्यातील नंदुरबार, वाशीम, धाराशिव, गडचिरोली या चार जिल्ह्यांचा आकांक्षित जिल्हा म्हणून समावेश आहे.

९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या एक दिवसीय कार्यशाळेचे सकाळी दहा वाजता उद्घाटन करण्यात येईल. कार्यशाळेत विशेष सचिव (लॉजिस्टिक्स) प्रधानमंत्री गती शक्ती बाबत सादरीकरण आणि व्हीडिओ प्रसारित करण्यात येईल.

“पीएम नॅशनल मास्टर प्लॅन फॉर एरिया डेव्हलपमेंट प्लॅनिंगवर जिल्हाधिकाऱ्यांसाठी हॅण्डबुक” या विषयावर सादरीकरण तसेच पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनवरील भूमिका आणि जबाबदाऱ्यांच्या संकलनावर सादरीकरण केले जाईल. तसेच पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्राच्या नियोजनाच्या सर्वांगीण नियोजनात गतीशक्ती  प्रधानमंत्री प्रात्यक्षिक तसेच  पीएम गतिशक्तीमध्ये क्षेत्र विकास दृष्टिकोनाचा अवलंब करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात यशोगाथा सादरीकरण होईल. यामध्ये एपएमपी/एसएमपी (NMP/SMP) प्लॅटफॉर्मचे सादरीकरण – (BISAG-N) द्वारे, उपयुक्तता आणि पायाभूत सुविधा मंत्रालये/विभागांद्वारे सादरीकरण,  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH दूरसंचार विभाग (DoT) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (MoPNG),  सामाजिक क्षेत्रातील मंत्रालये/विभागांद्वारे सादरीकरण, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आदिवासी व्यवहार मंत्रालय,  कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या द्वारा सादरीकरण करण्यात येईल. क्षेत्र विकास दृष्टिकोन अंगीकारण्यावर प्रात्यक्षिक, क्षेत्र विकासावर या कार्यशाळेत सादरीकरण केले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button