पाककला स्पर्धेत स्वरा राणे प्रथम : दीविजा वृध्दाश्रमाचे आयोजन
तळेरे (सिंधुदुर्ग) : निकेत पावसकर :असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात प्रजासत्ताक दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. अमृता थळी उपस्थित होते. यावेळी आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत सौ.स्वरा मयूर राणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
यावेळी आश्रमातील ध्वजारोहन सौ. अमृता थळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर सौ. थली यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजी आजोबांना आपल्या बालपणीचा शालेय जीवनातील झेंडावंदन करतानाचा क्षण आठवला व त्यांचा चेहऱ्यावर एक स्मित हास्य दिसू लागले. कार्यक्रमाची सांगता करून सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिविजा वृद्धाश्रम येथे महिलांसाठी पाककला स्पर्धचे नियोजन करण्यात आले. पाककला स्पर्धेचा विषय पौष्टिक पदार्थ असा होता. या स्पर्धेमध्ये महिलांनी वेगवेगळे प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवून आणले व त्यांचे सुंदररित्या सजावट करून मांडणी केली. या स्पर्धेचे परीक्षण सौ. शरयू ठुकरुल, सौ.मृणाल कुलकर्णी, श्रीम. आचरेकर यांनी केले.
पाककला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक –
सौ.स्वरा मयूर राणे, द्वितीय क्रमांक – सौ .अस्मी प्रसाद राणे, तृतीय क्रमांक – सौ. अनुजा अनंत आचरेकर तर उत्तेजनार्थ क्रमांक – सायली सुभाष तांबे, सौ. मंजिरी मंदार राणे यांनी क्रमांक मिळविले. या स्पर्धेमध्ये परिसरातील 20 महिलांनी सहभाग घेतला होता. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रोख रू. 1000, 700, 300 व साडी तर उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रू. 200 देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्वस्तिक फाऊंडेशनचे सेक्रेटरी संदेश शेट्ये, सदस्य श्रीम संध्या गायकवाड, किरण नारायणकर आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.