चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाईंग क्लबचे काम 26 जानेवारी पर्यंत करण्याचा संकल्प – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. ५/१२/२०२३ : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब  26 जानेवारी पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असून या अनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. फ्लाईंग क्लब संदर्भातील कामांची रीतसर परवानगी घेऊन धावपट्टीचे कार्पेटिंग,धावपट्टीच्या दुरुस्ती आणि  संरक्षण भिंत उभारणे आदी कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिले. फ्लाईंग क्लबचे काम 26 जानेवारी पर्यंत करण्याचा संकल्प आहे, असेही त्यांनी सांगितले.

             श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आज झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

      मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान तीन शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. सीएसआर फंडातून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही करावी.

      या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा, एमएडीसी चे मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button