मनसेचा विरार महानगर पालिका कार्यालयावर पाण्यासाठी विक्रमी महामोर्चा


मनसेचा विरार महानगर पालिका कार्यालयावर पाण्यासाठी विक्रमी महामोर्चा
विरार : 31/10/2023: मा.सौ.शर्मिलावहिनी राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व.मनसे नेते, ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष ,मा.श्री अविनाश दादा जाधव मार्गदर्शनाखाली वसई विरार महानगर पालिका मुख्य कार्यालय विरार येथे पाण्यासाठी विक्रमी महामोर्चा काढण्यात आला, ह्या मोर्चाला जिल्हा संघटक भाऊसाहेब गीते, गणेश लाड, हेमंत राठोड, अंकुश गुरव, परशुराम, अश्विनी पांचाळ, सीता ठाकूर, वर्षा मेस्त्री, प्राची मोगरे, सारिका व सर्व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. त्यावेळी सदर मोर्च्यामध्ये असंख्य कार्यकर्ते व त्रस्त नागरिक (महिला वर्ग) व जनहित कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अजय स. दाभोळकर,महा. राज्य उपाध्यक्ष