मनसे दणक्याने हिटणी नाका जवळ खचलेल्या रस्त्याचे डागडुजीचे काम सुरू


मनसेचा दणका ..
कोल्हापूर : 6/11/2023 : संकेश्वर बांदा महामार्गवरील हिटणी नाका जवळ काँक्रीटीकरण पुर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झालेला रस्ता खचला होता. या खचलेल्या रस्त्यामध्ये वेगाने येणारी वाहने आदळून अपघात होत होते. सोशल मीडियावर सदर रस्त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते, याची दखल घेत काल संबंधित अधिकारी यांना मनसे जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर नागेश चौगुले यांनी फोन करून त्या ठिकाणी कारवाई करण्यास सांगितले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फोन मुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि तात्काळ दखल घेत आज सकाळ पासून सदर खचलेल्या रस्त्याचे डागडुजीचे काम चालू झाले आहे.
यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, जिल्हा सचिव वैभव माळवे, गडहिंग्लज शहराध्यक्ष केमपान्ना कोरी, महाराष्ट्र सैनिक विनायक शेटके उपस्थित होते.