दिपक नाईकनवरे सर मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, राजस्तरीय कलारत्न / क्रीडारत्न गौरव २०२३-२४ पुरस्काराने सन्मानित

पंढरपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा दिपक राजाराम नाईकनवरे (डी.एन. रॉक) सर मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, राजस्तरीय कलारत्न / क्रीडारत्न गौरव २०२३-२४ पुरस्काराने सन्मानित

क्रिकेट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले पंढरीचे सुपुत्र दिपक राजाराम नाईकनवरे यांनी पंढरपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोविला आहे. दिपक नाईकनवरे आतापर्यंत अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. त्यातच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कलारत्न/क्रीडारत्न पुरस्काराचे यंदाचे मानकरी दिपक नाईकनवरे ठरले आहेत. यामध्ये त्यांना सन्मानपत्र, आकर्षक ट्रॉफी, मानाचा फ़ेटा, शाल देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना दिपक राजाराम नाईकनवरे म्हणाले की, मला माझ्या पंढरपूरचे आई-वडिलांचे, मोठ्या बंधूचे व सर्व मार्गदर्शकांचे मार्गदर्शन असल्यामुळे हे शक्य झाले. पुढे देखिल क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, कला, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिक यशस्वी आणि उत्तम कामगिरी करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर, मायकल वॉन, बिली बाऊंडन यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी दखल घेतलेले आतपर्यंतचे सर्वात लोकप्रिय क्रिकेट अंपायर म्हणून दिपक राजाराम नाईकनवरे यांची संपूर्ण भारतदेशभर ओळख निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये इच्छा अंपायरिंग करण्याची इच्छा देखिल त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे दिपक राजाराम नाईकनवरे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button